राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता अखेरच्या टप्प्यामध्ये आली आहे. कन्याकुमारी ते कश्मीर पायी प्रवास सुरू असताना अनेक सामान्य नागरिकांसोबतच काही नेते, अभिनेते, अन्य मान्यवर देखील त्यांच्यासमवेत चालले. आज (24 जानेवारी) राहुल गांधींसोबत उर्मिला मातोंडकर देखील भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या. उर्मिला या अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या आहेत. मात्र मागील काही महिन्यांपासून त्या कुठेच सक्रिय दिसत नव्हत्या. आज 'भारत जोडो यात्रा' मध्ये सहभागी होताना त्यांनी आपला सहभाग राजकीय कारणांसाठी नसून सामाजिक कारणांसाठी असं म्हटलं आहे.

उर्मिला मातोंडकर यांचा सहभाग

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)