उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. येथे एका तरुणाला आधी हातपाय बांधून बेदम मारहाण करण्यात आली, त्यानंतर त्याला बूट आणि चप्पलांचा हार घालण्यात आला आणि त्यानंतर त्याला लघवीही पाजण्यात आली. एवढेच नाही तर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाबाबत मुरादाबाद पोलिसांनी सांगितले की, 'या संदर्भात, सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन आरोपींना पोलीस स्टेशन सिव्हिल लाइन्सने अटक केली आहे, पुढील कारवाई सुरू आहे.' माहितीनुसार, सिव्हिल लाइन्समधील आगवानपूर येथून कारमधील एका तरुणाचे अपहरण करण्यात आले. यानंतर त्याला खोलीत बंधक बनवून बेदम मारहाण केली. आरोपींनी त्याच्या गळ्यात चपलांच्या माळा घालून त्याला जबरदस्तीने लघवी पाजण्यात आली. (हेही वाचा: Viral Video: मंदिरात पूजेदरम्यान तरुणाने डोक्यावर फोडला नारळ, स्टंटबाजी पडली महागात)

व्हिडिओ-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)