देशातील एका मोठ्या आयपीओ (IPO) लाँचची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, LIC चा IPO 4 मे रोजी लॉन्च होणार असून 9 मे पर्यंत गुंतवणूकदार या IPO मध्ये अर्ज करू शकतील. या संदर्भात मंगळवारी एलआयसी बोर्डाची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, त्यात लॉन्चच्या तारखेवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती बिझनेस टुडेला सूत्रांनी दिली आहे. बैठकीत त्याची अधिकृत घोषणा केली जाईल. याआधी सरकार देशातील सर्वात मोठ्या आयुर्विमा कंपनीतील 5% हिस्सा विकणार होते, पण आता सरकार IPO साठी फक्त 3.5% हिस्सा देणार आहे. IPO साठी LIC चे मूल्यांकन 6 लाख कोटी रुपये करण्यात आले आहे. बाजारातील मागणी चांगली असेल तर सरकार त्यात 5 टक्के वाढ करू शकते, असे एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)