Terror Attacks in India: नेपाळ-भारताच्या सोनौली सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात घुसलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांना यूपी एटीएसने अटक केली आहे. त्यापैकी दोन पाकिस्तानचे नागरिक आहेत तर एक काश्मीरचा आहे. काही पाकिस्तानी नागरिक आयएसआयच्या मदतीने नेपाळ सीमेवरून भारतात प्रवेश करणार असल्याची माहिती यूपी एटीएसला मिळाली होती, ज्यावर एटीएस फील्ड युनिट गोरखपूरने पाळत ठेवून या तिघांना अटक केली. या सर्वांनी भारतात दहशतवादी घटना घडवण्याची योजना आखली होती. त्यांनी आयएसआयच्या मदतीने हिजबुल मुजाहिद्दीनच्या प्रशिक्षण शिबिरातून प्रशिक्षणही घेतले आहे. सय्यद गझनफर, मोहम्मद अल्ताफ बट आणि नासिर अली अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. अल्ताफने सांगितले की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय काश्मीरस्थित दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनच्या सहकार्याने भारतात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने भारतीय लोकांची भरती करत आहे. (हेही वाचा: Rajastan Murder Video: अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू, आरोपी पोलिसाचा मुलगा, थरारक घटना CCTV कैद)
#BigBreaking - यूपी एटीएस ने दो पाकिस्तानी नागरिक समेत 3 संदिग्धों को किया गिरफ्तार #UPPolice #ATS #Terrorist #terrorattack #Pakistani #Nepal #raftaar pic.twitter.com/4OQL5CXO97
— raftaar (@raftaar) April 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)