आजकाल रील बनवण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रील बनवण्याच्या नादात अनेक अपघातही घडले आहेत. आता तेलंगणातील वारंगलमधून रीलशी निगडीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी रील बनवताना एका तरुणाला जीव गमवावा लागला. अजय असे मृत तरुणाचे नाव असून तो 23 वर्षांचा होता. फावल्या वेळात रील बनवण्याची त्याला आवड होती. अहवालानुसार, मंगळवारी रात्री अजय काम आटोपून घरी परतला. त्यानंतर गळफास लावून घेत असतानाचा व्हिडिओ बनवण्याच्या उद्देशाने त्याने मोबाईल फ्रीजवर ठेवला आणि तो गळफास लावून घेऊ लागला. हा व्हिडीओ बनवताना चुकून त्याच्या गळ्यात फास घट्ट बसला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अजयच्या फोनची तपासणी केली असता, त्यांना कळले की त्याला रील बनवण्याची आवाढ होती. आता हा छंद त्याच्या जीवाचा शत्रू बनला. (हेही वाचा: Sex-Change Surgery: झोपेत असताना पुरुषाचे गुप्तांग काढले, जबरदस्तीने केली लिंग बदलाची शस्त्रक्रिया; यूपीच्या मुझफ्फरनगरमधील धक्कादायक घटना) 

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)