Surgery | Representational image. (Photo Credits: sasint/pixabay)

Sex-Change Surgery: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील (Muzaffarnagar) शाहपूर पोलीस स्टेशन परिसरात लिंग बदलाचे (Sex Change) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आपल्या संमतीशिवाय आपले लिंग बदलण्यात आल्याचा आरोप येथील एका व्यक्तीने केला आहे. अहवालानुसार, तो मुलगा म्हणून झोपला, पण जेव्हा तो जागा झाला तेव्हा त्याचे रूपांतर मुलीत झाले होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया (Gender Reassignment Surgery) करून या मुलाचा प्रायव्हेट पार्ट काढून त्या जागी मुलीचा प्रायव्हेट पार्ट लावला. मुजाहिद असे पीडितेचे नाव आहे. त्याचे वय 20 वर्षे आहे.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांच्या संगनमताने हा प्रकार करण्यात आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. भारतीय किसान युनियनने (बीकेयू) निषेध केला आहे.

पीडितेवर मन्सूरपूरच्या बेगराजपूर मेडिकल कॉलेजमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. 3 जून रोजी ओमप्रकाश नावाच्या व्यक्तीने आपली फसवणूक करून ही शस्त्रक्रिया घडवल्याचा आरोप त्याने केला आहे. ओमप्रकाशने डॉक्टरांना मुजाहिदवर शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. यामध्ये मुजाहिदचे गुप्तांग काढून टाकणे आणि जबरदस्तीने लिंग बदल करणे यांचा समावेश होता. मुजाहिद आणि ओमप्रकाश दोघेही एकाच ठिकाणी काम करत असून, ते दोघे एकत्र राहत होते.

गेल्या दोन वर्षांपासून ओमप्रकाश आपल्याला धमकावत आहे, आपल्याला त्रास देत आहे असा आरोपही मुजाहिदने केला आहे. मुजाहिदने सांगितले की, ओमप्रकाशने आपल्याला काही वैद्यकीय समस्या असल्याचे खोटे सांगत रुग्णालयात नेले. त्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्याला भूल दिली. यानंतर आपल्यावर लिंग बदलण्याचे ऑपरेशन करण्यात आले. या फसवणुकीबाबत मुजाहिद न्यायासाठी याचना करत आहे.

मुजाहिदने असाही आरोप केला की, या शस्त्रक्रियेनंतर ओमप्रकाशने त्याला धमकावले की, ‘मी तुला पुरुषातून स्त्री बनवले आहे. आता तुला माझ्यासोबत राहावे लागेल. मी वकील तयार केला आहे. मी तुझ्यासाठी कोर्ट मॅरेजचीही व्यवस्था केली आहे. तू तयार नसशील तर, मी तुझ्या वडिलांना गोळ्या घालीन आणि तुझ्या वाट्याची जमीन माझ्या नावावर करीन.’ (हेही वाचा: Cockroach Found in Meal on Train: वंदे भारत एक्सप्रेसमध्ये दिल्या गेलेल्या अन्नामध्ये प्रवाशाला आढळले मृत झुरळ; IRCTC ने माफी मागितली)

दरम्यान, बुधवारी संध्याकाळी बीकेयूचे राज्य उपाध्यक्ष नीरज पहेलवान यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी वैद्यकीय महाविद्यालयात या प्रकरणावरुन गोंधळ घातला. पीडितेला 50 लाखांची आर्थिक मदत आणि ऑपरेशन करणारे डॉक्टर आणि ओमप्रकाशवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. शेतकरी नेते श्याम पाल यांच्यामते ही घटना रुग्णालयात अवयव तस्करीच्या मोठ्या मुद्द्याकडे निर्देश करते. याबाबत मुजाहिदच्या वडिलांनी 16 जून रोजी पोलीस तक्रार दाखल केली होती, ज्याद्वारे ओमप्रकाशला अटक करण्यात आली.