हैद्राबादमधील एका व्यक्तीने ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (GHMC) वॉर्ड ऑफिसमध्ये कथितपणे साप सोडल्याची घटना समोर आली आहे. ही व्यक्ती त्याच्या तक्रारीचे निराकरण करण्याबाबत अधिकाऱ्यांच्या उदासीन वृत्तीबद्दल संतप्त होती, त्यातूनच हे कृत्य घडल्याचे सांगण्यात येत आहे. माहितीनुसार, हा साप त्या व्यक्तीच्या घरात घुसला होता, ज्याला त्याने स्वतः पकडून मंगळवारी अलवल येथील जीएचएमसी वॉर्ड ऑफिसमध्ये सोडले होते. बुधवारी सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, साप टेबलावर दिसत आहे आणि दुसरीकडे ही व्यक्ती अधिकाऱ्यांशी वाद घालत आहे. त्याच्या तक्रारीवर तोडगा न निघाल्याने तो संतापला होता. या प्रकरणी जीएचएमसीच्या अधिका-यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. (हेही वाचा: Cobra Snake Inside Man's Shirt: झाडाखाली झोपलेल्या व्यक्तीच्या शर्टमध्ये शिरला भलामोठा साप, जाणून घ्या काय घडले पुढे)
A resident releases a snake that entered his home due to rain, in a GHMC ward office at Alwal, Hyderabad, after authorities failed to respond to his complaint. #Hyderabad #GHMC #Residents #AuthoritiesFail #RainTroubles pic.twitter.com/hiraGqxlbH
— Deccan Chronicle (@DeccanChronicle) July 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)