साप छोटा असो वा मोठा, त्याला पाहून अनेकांची घाबरगुंडी उडते. पावसाळ्यात घरांमध्ये साप शिरण्याचे प्रमाण वाढले आहे व अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता झाडाखाली झोपलेल्या व्यक्तीच्या शर्टमध्ये साप शिरल्याची घटना समोर आली आहे. किंग कोब्राचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये तुम्ही सापाला व्यक्तीच्या शर्टमध्ये शिरताना पाहू शकता. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. व्यक्तीच्या शर्टमध्ये साप शिरलाच कसा? असा प्रश्न नेटिझन्स विचारात आहेत.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती झाडाखाली बसली आहे व तिच्या शर्टमध्ये साप घुसला आहे. व्हिडिओ शूट करणारे लोक या व्यक्तीला न हलता शर्टची बटणे काढण्यास सांगत आहेत. व्यक्तीने शर्टची बटणे काढल्यानंतर साप शर्टमधून बाहेर पडून निघून जातो. (हेही वाचा: Sea Lions Viral Video: समुद्री सिंह करतोय पर्यटकांसोबत धमाल, व्हिडिओ व्हायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)