Sea Lions Viral Video | Twitter

Sea Lions Viral Video: पर्यटनाला जाणाऱ्यांसाठी समुद्री सिंह हा अनेकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, समुद्री सिंह पर्यटकांसोबत धमाल मस्ती करतो आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ सॅन डिएगोच्या प्रसिद्ध ला जोला कोव्ह येथील असल्याचे बोलले जात आहे. ज्यामध्ये सिंहाला पाहून समुद्रकिनाऱ्यावर असेल्या पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळते आहे.

फॉक्स5 ने दिलेल्या वृत्ताननसार,उन्हाळी सुट्टीसाठी कॅलिफोर्नियातील सर्वात प्रतिष्ठित समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या संख्येने उपस्थिती होते. या गर्दीला सुंदर समुद्री सस्तन प्राणी आणि त्याच्या पिल्लाचे दर्शन झाले. या दोन्ही प्राण्यांचे फोटो काढण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत होते.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, समुद्री सिंह फोटो काढणाऱ्या पर्टटकांचा पाटलाग करताना दिसत आहेत. सस्तन प्राण्यांना त्यांच्या जवळ येताना पाहून लोक ओरडताना आणि धावताना पाहायला मिळतात. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. काही सोशल मीडिया वापरकर्ते म्हणाले की मानवांनी त्यांच्या (प्राण्यांच्या) जागेवर अतिक्रमण करू नये, तर काहींनी म्हटले की समुद्र सिंह कदाचित एकमेकांचा पाठलाग करत आहेत. त्यांना अजिबात दोष देऊ नका. माणसं ही या पृथ्वीवरची एक भयंकर रोगराई आहे आणि सीलन्सना ते माहित आहे. (हेही वाचा, बोरिवलीतल्या श्रीकृष्ण नगर मध्ये SGNP मध्ये माकडांचा हैदोस; अवधूत गुप्ते यांनी व्हिडिओ शेअर करत मांडली व्यथा)

व्हिडिओ

सागरी सिंह हा Otariidae कुटुंबातील सागरी सस्तन प्राण्यांचा समूह आहे. ते सील आणि वॉलरसशी जवळून संबंधित आहेत. हे आकर्षक प्राणी जगाच्या विविध किनारी भागात, प्रामुख्याने पॅसिफिक आणि दक्षिण अटलांटिक महासागरांमध्ये आढळतात. ते जमीन आणि पाण्याच्या दोन्ही वातावरणात अत्यंत अनुकूल आहेत. समुद्री सिंहांच्या काही सुप्रसिद्ध प्रजातींमध्ये कॅलिफोर्निया समुद्री सिंह, स्टेलर समुद्री सिंह, ऑस्ट्रेलियन समुद्र सिंह आणि दक्षिण अमेरिकन समुद्र सिंह यांचा समावेश आहे. या प्रत्येक प्रजातीची जगाच्या विविध भागांमध्ये विशिष्ट वैशिष्ट्ये आणि श्रेणी आहेत. समुद्री सिंहांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहणे हा एक उल्लेखनीय अनुभव असू शकतो, परंतु मानवी उपस्थितीमुळे या अविश्वसनीय प्राण्यांना त्रास होणार नाही किंवा हानी पोहोचणार नाही याची खात्री करून ते जबाबदारीने पाहणे आवश्यक आहे.