पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर दिल्ली, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र आणि राजस्थानचे पोलीस देशातील विविध राज्यांमध्ये छापे टाकून हत्येमध्ये सहभागी असलेल्या शूटर्सचा ठिकठिकाणी शोध घेत होते. या हत्येमध्ये सहभागी असलेले अंकित, प्रियव्रत, सचिन, कपिल आणि दीपक मुंडी हे शूटर्स गेले अनेक दिवस बाहेर मोकाट फिरत होते, मात्र आता त्यापैकी काहींना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान या मारेकऱ्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हत्येनंतर आरोपी फरार होत असतानाचा हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये कारमध्ये गाणी वाजवली जात असून, सर्वजण हातामध्ये बंदुकी घेऊन हसत-खिदळत असल्याचे दिसत आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सचिन, अंकित, प्रियव्रत आणि कपिलला अटक केली आहे, तर व्हिडिओमध्ये दिसणारा दीपक अद्याप फरार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)