Salil Kapoor Dies by Suicide: देशातील प्रसिद्ध सायकल उत्पादक कंपनी ॲटलसचे माजी अध्यक्ष सलील कपूर यांनी मंगळवारी (3 सप्टेंबर) आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्यानंतर ताबडतोब पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सलील कपूर यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम लेन येथील त्यांच्या निवासस्थानी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली, असे दिल्ली पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस पथकाला घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये काही लोकांवर छळ केल्याचा आरोप आहे.

माहितीनुसार, सलील कपूर 70 वर्षांचे होते. त्यांच्या घरात एक छोटे मंदिर बांधले होते. याच मंदिरात बसून त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत:वर गोळी झाडून घेतली. सलील कपूर आर्थिक संकटातून जात होते आणि त्यांनी लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले होते. त्यांच्यावर खूप कर्ज होते. त्यांचा पत्नीपासून घटस्फोट झाला असून मुलेही वेगळी राहतात. याआधी 2015 मध्ये सलील कपूर यांना 9 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या दोन प्रकरणांमध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) उत्तराखंडमधून अटक केली होती. (हेही वाचा: Cow Vigilantes Killed Student: गोरक्षकांकडून बारावीच्या विद्यार्थ्याची हत्या, पाच जणांना अटक; फरीदाबाद येथील घटना)

ॲटलस सायकल्सचे माजी अध्यक्ष सलील कपूर यांची आत्महत्या-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)