जम्मू कश्मीर मध्ये काल भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला आहे. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत आहे. 53 सीटर बसमध्ये शिव खोरी मंदिर ते माता वैष्णवदेवी कटरा दरम्यान बस प्रवास करताना त्यांच्यावर हल्ला झाला. या बसमध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली मधून प्रवासी प्रवास करत होते. चालत्या बसवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्यांची बस दरीत कोसळली. यामध्ये 10 जण मृत्यूमुखी पडले असून अन्य अनेक जण जखमी आहेत. सध्या या Reasi मध्ये स्थानिक पोलिस आणि लष्कराच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरू आहे. बसवर हल्ला झाल्याच्या क्षणाचा व्हिडिओ आता सोशल मीडीयामध्ये समोर आले आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)