आरबीआय ने आज पतधोरण जाहीर केले आहे. गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार आरबीआयने यंदाही रेपो दर 6.5% वर कायम ठेवला आहे. रेपो दर हा व्याजदर आहे ज्यावर RBI इतर बँकांना कर्ज देते. त्यामध्ये बदल केला नसल्याने कर्ज घेतलेल्यांना पुन्हा दिलासा मिळाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दर दोन महिन्यांनी चलनविषयक धोरणावर तीन दिवसीय बैठक घेते. यामध्ये रेपो दरासोबत इतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)