डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम तलवारीने केक कापून स्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना दिसला आहे. कोर्टातून 40 दिवसांचा पॅरोल मिळाल्यानंतर राम रहीम शनिवारी बागपतमधील त्याच्या बर्नवा आश्रमात पोहोचला. तिथे त्याने तलवारीने केक कापला. बलात्कार आणि हत्येप्रकरणी तो रोहतकच्या सुनारिया कारागृहात शिक्षा भोगत आहे. डेरा सच्चा सौदाच्या प्रमुखाने पॅरोलदरम्यान केक कापल्याच्या व्हायरल व्हिडिओने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याच्या या उत्सवात अनेक अनुयायी सामील झाले होते. शस्त्रास्त्रांचे सार्वजनिक प्रदर्शन म्हणजेच तलवारीने केक कापण्यास शस्त्र कायद्यानुसार बंदी आहे.

एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राम रहीमने 40 दिवसांचा पॅरोल मागण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी राम रहीमला ऑक्टोबर 2022 मध्ये 40 दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले होते. हरियाणा पंचायत निवडणूक आणि आदमपूर विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वीच त्याला पॅरोल देण्यात आला होता. ऑगस्ट 2017 मध्ये पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने त्याला दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)