Rohit Sharma Birthday Celebration: रोहित शर्माने त्याचा ३८ वा वाढदिवस अतिशय खास पद्धतीने साजरा केला. यावेळी त्यांची पत्नी रितिका सजदेह आणि मुंबई इंडियन्सचे सहकारी देखील उपस्थित होते. त्याच्या वाढदिवसानिमित्त, त्याचे फोटो आणि "हॅपी बर्थडे हिटमॅन" लिहिलेला एक खास चॉकलेट केक तयार करण्यात आला होता. रोहितने त्याची पत्नी रितिकासोबत केक कापला (Rohit Sharma Cuts Cake) आणि तिला गोड मिठी मारली. यानंतर, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी सॅलिब्रेशन परंपरेनुसार, रोहितच्या चेहऱ्यावर केक लावला. शेवटी, रोहितने हात जोडून सर्वांचे आभार मानले.
रोहित शर्माने केक कापून वाढदिवस साजरा केला
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)