Railway Staff Members Attack Passenger: सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका भारतीय रेल्वे ट्रेनचा असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये टीटीई आणि रेल्वे कर्मचारी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहेत. काही प्रवाशांनी या मारहाणीचा व्हिडिओ बनवला, जो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, टीटीई व्यक्तीला खाली पाडून त्याला मारत आहे, तर दुसरा रेल्वे कर्मचारी बेल्ट काढून त्या व्यक्तीला मारहाण करत आहे. ही क्रूर मारामारी पाहून काही लोकांनी हस्तक्षेप केला आणि त्यानंतर रेल्वे कर्मचारी शांत झाले.

ही घटना अमृतसर आणि कटिहार रेल्वे स्थानकांदरम्यान 15708 आम्रपाली एक्स्प्रेसमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे. माहितीनुसार, शेख मुजीबुल नावाचा हा प्रवासी दारूच्या नशेत होता आणि ट्रेनमध्ये उलट्या करत होता. तसेच बाथरूममध्ये कचरा टाकत होता. सत्येंद्र नावाच्या प्रवाशाने सर्वप्रथम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या प्रकरणाची तक्रार केली, त्यानंतर आरपीएफ, जीआरपी आणि पोलीस अधिकारी सक्रिय झाले. यादरम्यान टीटीई राजेश कुमार आणि अटेंडंट विक्रम यांनी प्रवाशाला मारहाण करण्यास सुरुवात केली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रवाशाने महिला प्रवाशांसोबत असभ्य वर्तन केल्याची तक्रार आली होती. याबाबत त्याची विचारपूस केली, मात्र त्याने शिवीगाळ केली. त्यानंतर वाद वाढत गेला. (हेही वाचा: Mother Viral Video: मुलासाठी आई दूध घेण्यासाठी स्टेशनवर उतरली आणि मग ट्रेन झाली सुरू; पुढे जे घडले ते पाहून सर्वच झाले भावूक)

रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला केली मारहाण-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)