भारतीय हवामान विभागाने राज्यातील विविध शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तरी आज आणि उद्या म्हणजेच 14 आणि 15 जुलै रोजी हवामान विभागाकडून पुण्यात (Pune) रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. पुण्यात आज सकाळपासून पावसानं जोरदार बरसायला सुरुवात केली आहे.  पुणे जिल्हा आणि आजुबाजूचा परिसर पावसाळी पर्यटनासाठी अव्वल समजला जातो. मात्र रेड अलर्ट असल्याने पर्यटकांना सावधानतेचा इशारा देत नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)