अखिल भारतीय महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली असून, या निवडीचे पत्र नुकतेच परिषदेकडून त्यांना प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील ही महापौरांची परिषद असून परिषदेचे अध्यक्ष आणि आग्र्याचे महापौर श्री. नवीन जैन जी यांनी निवडीचे पत्र दिले आहे.

याबाबत बोलताना मोहोळ म्हणाले की, 'पुणे शहराला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासोबतच शहराच्या शाश्वत विकासावर याचा कोणताही परिणाम होऊ दिला नाही. हे शिवधनुष्य आगामी काळातही पेलू. संपूर्ण कारकिर्दीत पुणेकरांची लाभलेली साथ आणि आमच्यावर दाखवलेला विश्वास हाही या टप्प्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.'

अखिल भारतीय महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची निवड

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)