भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांना PM Narendra Modi यांच्याकडून श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली आहे. मोदींनी शोकसंदेश ट्वीट केला आहे. जनकल्याणासाठी तसेच पुणे आणि परिसराच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कामाची देखील उल्लेख करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कर्करोगाशी झुंजत असलेल्या जगताप यांचं वयाच्या 59 व्या वर्षी निधन झालं आहे. नक्की वाचा: Laxman Jagtap Dies: आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, अजित पवार यांच्यासह मान्यवरांकडून श्रद्धांजली .
पहा ट्वीट
महाराष्ट्र विधानसभेतील आमदार लक्ष्मण जगताप जी यांच्या निधनाने दुःख झाले .जनकल्याणासाठी तसेच पुणे आणि परिसराच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले.त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांप्रती माझ्या शोक संवेदना. ओम शांती.
— Narendra Modi (@narendramodi) January 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)