Laxman Jagtap Dies: आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, अजित पवार यांच्यासह मान्यवरांकडून श्रद्धांजली
क्ष्मण जगताप यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड शहरातील एक महत्त्वाचे राजकीय व्यक्तीमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळातही लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे दु:ख व्यक्त केले जात आहे. अनेक बड्या नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले आहे.
Laxman Jagtap Dies: भाजप आमदार आमदार लक्ष्मण जगताप यांचे पाठिमागील प्रदीर्घ काळापासून सुरु असलेल्या आजारामुळे निधन झाले आहे. पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड शहरातील एक महत्त्वाचे राजकीय व्यक्तीमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळातही लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे दु:ख व्यक्त केले जात आहे. अनेक बड्या नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले आहे.
पाहा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले.मतदारसंघाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो व जगताप कुटूंबियांना दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो ही प्रार्थना.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 3, 2023
आमदार रोहित पवार
विधानसभेतील माझे सहकारी आमदार लक्ष्मण जगताप जी यांचं दीर्घ आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!?
या दुःखातून सावरण्याचं बळ जगताप कुटुंबियांना मिळो, ही प्रार्थना! pic.twitter.com/u9r01ffPKW
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 3, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रदीर्घ आजराने दुःखद निधन झाले. सर्वसमान्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेले प्रभावी नेतृत्व आज आपल्यातून हरपले. जगताप कुटुंबीयांच्या दुःखात मी सहसंवेदना व्यक्त करतो व दिवंगत लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/itYzHkjZyK
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 3, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2023 12:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

