पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पोलंडच्या दौर्यावर आहे. या दौर्या दरम्यान त्यांनी राजधानी वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारकाला भेट दिली. महाराष्ट्राच्या संस्कृतीचं कौतुक करताना त्यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलिश निर्वासितांसाठी आशेचा किरण ठरलेल्या महाराष्ट्रातील वळिवडे गावाचा उल्लेख केला. त्यामागील मानवतावादी विचारांचा पीएम मोदी यांनी पोलंड मध्ये मराठीत उल्लेख करत उपस्थित मराठीजनांची मनं जिंकली. वॉर्सा येथील स्मारक कोल्हापूरच्या महान राजघराण्याला दिलेली मानवंदना आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी X वर मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
पोलंड मध्ये मोदी मराठीत बोलतात तेव्हा...
When Hon PM Modi ji speaks Marathi in Poland !
Thank you, Hon PM Narendra Modi Ji, for honouring and remembering Maharashtra’s rich legacy of supporting Polish refugees during World War II.
Honouring a Legacy of Friendship and Valour – Celebrating 70 Years of Diplomatic Ties… pic.twitter.com/Xktyo935mJ
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)