सध्या जवळजवळ प्रत्येकजण स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा संगणक वापरत आहे. एकीकडे तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडत आहे, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात मालवेअर अटॅकच्या बातम्याही समोर येत आहेत. हे मालवेअर इंटरनेटद्वारे वापरकर्त्याच्या उपकरणात सहज प्रवेश करतात. अलीकडेच एक नवीन मालवेअर दिसला आहे, ज्याला Chameleon Malware असे नाव देण्यात आले आहे. हा रंग बदलू सरडा मालवेअर अत्यंत धोकादायक आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया आणि पोलंडमधील इंटरनेट वापरकर्त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. सायबल रिसर्च अँड इंटेलिजेंस लॅब्स (CRIL) मधील सुरक्षा संशोधकांनी शोधून काढलेला मालवेअरचा हा नवीन प्रकार त्याच्या वैशिष्ठ्यांमुळे सायबर गुन्हेगारांसाठी गेम चेंजर ठरू शकतो. हा मालवेअर खास संगणक किंवा मोबाइलला हानी पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा मालवेअर संवेदनशील माहिती (क्रेडिट कार्ड नंबर किंवा पासवर्ड) चोरू शकतो.

महत्वाचे म्हणजे हा नवीन अँड्रॉइड बँकिंग ट्रोजन (मालवेअरचा प्रकार) सध्या मोबाइल बँकिंग क्षेत्रात प्रवेश करत आहे. एक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी अॅप, CoinSpot म्हणून हे Chameleon बँकिंग ट्रोजन युजर्सच्या समोर येते. तो आपण ऑस्ट्रेलियातील सरकारी एजन्सी किंवा पोलंडमधील आयकेओ बँक (IKO Bank) असल्याचे भासवतो आणि युजर्सचा डेटा चोरतो. महत्वाचे म्हणजे हा मालवेअर चॅटजीपीटी आणि क्रोम सारख्या विविध सॉफ्टवेअरच्या आयकॉन्सचा वापर करून वापरकर्त्यांना संक्रमित करत असलेला आढळून आला आहे. ज्यामुळे लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा: वैयक्तिक आयुष्यावर होऊ शकतो 'Artificial Intelligence' चा नकारात्मक परिणाम; इंटरनेटवर डीपफेक पॉर्न व्हिडीओमध्ये वाढ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)