Plane Crash in Poland: उत्तर पोलंडमध्ये प्रशिक्षणादरम्यान फायटर जेट झाले क्रॅश; हवेत घेतला पेट, पहा धक्कादायक व्हिडिओ (Watch)

दुर्दैवाने, विमानातील पोलिश हवाई दलाचा पायलट बाहेर पडू शकला नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र अद्याप याबाबत काही ठोस माहिती मिळू शकली नाही.

Plane Crash in Poland: उत्तर पोलंडमध्ये प्रशिक्षणादरम्यान फायटर जेट झाले  क्रॅश; हवेत घेतला पेट, पहा धक्कादायक व्हिडिओ (Watch)
Plane Crash in Poland

Plane Crash in Poland: शुक्रवारी उत्तर पोलंडमध्ये प्रशिक्षण उड्डाणदरम्यान एक लढाऊ विमान क्रॅश झाल्याची माहिती मिळत आहे. ग्डिनिया एअर बेस (Gdynia Air Base) येथे हा अपघात घडला. ग्डिनिया हे पोलंडच्या बाल्टिक किनाऱ्यावरील एक बंदर शहर आहे. दुर्दैवाने, विमानातील पोलिश हवाई दलाचा पायलट बाहेर पडू शकला नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र अद्याप याबाबत काही ठोस माहिती मिळू शकली नाही. विमान कोसळल्यानंतर ताबडतोब आपत्कालीन सेवा मदतीसाठी धावल्या. या अपघाताचे व्हिडिओ फुटेज समोर आले आहे, ज्यात विमान क्रॅश होऊन पेट घेताना दिसत आहे. अधिकारी अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत. (हेही वाचा: Baba Vanga's Prophecies: 'जगाचा होणार विनाश' द नॉस्ट्रॅडॅमस ऑफ द बाल्कन अर्थात बाबा वेंगा यांची भविष्यवाणी, घ्या जाणून)

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 12, 2024 07:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).