देशभरात अनेक लोक सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करतात. त्यामुळे सोशल मिडियावरही अशा नोकऱ्यांबाबत अनेक जाहिराती समोर येत असतात. यातील काही खऱ्या असतात तर काही खोट्या. आताही सोशल मीडियावर एक जाहिरात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की भारतीय रेल्वेद्वारे सुमारे 29,000 रिक्त पदानावर नोकर भरती होत आहे. जाहिरातीनुसार, भारतीय रेल्वेद्वारे असिस्टंट लोको पायलट आणि तंत्रज्ञांच्या पदांसाठी सुमारे 29,000 रिक्त जागा ऑफर करत आहे. हा संदेश व्हायरल झाल्यानंतर याची पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. पीआयबीने केलेल्या तथ्य तपासणीनुसार, रेल्वे मंत्रालयाने अशी कोणतीही जाहिरात जारी केलेली नाही. (हेही वाचा: Justin Trudeau Faces Wrath of Angry Citizen: 'तुम्ही देशाची वाट लावली'; कॅनडाच्या पंतप्रधानावर जेव्हा नागरिकाने प्रत्यक्ष भेटीत घेतलं तोंडसुख)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)