जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल संपूर्ण देशात संताप आहे. दहशतवाद्यांवर आणि पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी सतत होत आहे. या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतेक पर्यटक होते. आता, या दहशतवादी हल्ल्याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पहिले विधान समोर आले आहे. या दहशतवादी हल्ल्याला योग्य उत्तर दिले जाईल, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ‘पहलगाममधील भ्याड कृत्यात अनेक निष्पाप लोकांनी प्राण गमावले. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. दहशतवादाविरुद्ध भारताचे शून्य सहनशीलतेचे धोरण आहे. मी देशवासियांना खात्री देऊ इच्छितो की सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलेल. आम्ही केवळ या कृत्याच्या गुन्हेगारांपर्यंतच नाही तर, पडद्यामागील लोकांपर्यंतही पोहोचू. याचे जोरदार आणि स्पष्ट प्रत्युत्तर दिले जाईल.’ (हेही वाचा: 'Surgical Strike 3.0': पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू; संतप्त नेटिझन्सनी पाकिस्तानविरुद्ध सर्जिकल स्ट्राइकसह कठोर सूड घेण्याची मागणी)

Pahalgam Terrorist Attack:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)