Prajwal Revanna Sex Scandal: कर्नाटकमधील हसनचे निलंबित खासदार प्रज्वल रेवन्नाच्या सेक्स स्कँडलमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात, 26 एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर त्याचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले होते. तसेच त्याचे वडील आणि जेडीएस नेते एचडी रेवन्ना याच्यावरही लैंगिक शोषणासह इतर गंभीर आरोप करण्यात आले होते. आता एका अपहरणाच्या आरोपानंतर जेडीएस नेते आणि प्रज्वल रेवन्नाचे वडील एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रज्वल रेवन्ना हा सेक्स स्कँडल प्रकरणात देश सोडून फरार आहे. प्रज्वल रेवन्नाचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक एचडी देवे गौडा यांच्या बेंगळुरू येथील घरी पोहोचले होते. यानंतर एचडी रेवन्नाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर दोन एफआयआर दाखल आहेत. भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा मुलगा एचडी रेवन्ना आणि त्यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

आता एका महिलेच्या अपहरणाच्या प्रकरणात न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी लगेचच एचडी रेवन्नाला ताब्यात घेतले. या सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी प्रज्वल रेवन्ना विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे.

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)