ईडी प्रमुख संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ आज म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी संपला. त्यानंतर आता ईडीचे विशेष संचालक राहुल नवीन यांची ईडीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संजय कुमार मिश्रा यांनी सुमारे 4 वर्षे 10 महिने ईडीचे संचालक म्हणून काम केले. राहुल नवीन हे 1993 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. विशेष संचालक असण्याव्यतिरिक्त, राहुल नवीन ईडी मुख्यालयाचे मुख्य दक्षता अधिकारी म्हणूनही काम करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या संचालकाची औपचारिक नियुक्ती होईपर्यंत ते प्रभारी संचालकपदाची जबाबदारी पार पाडतील.

संजय कुमार मिश्रा यांची 2018 मध्ये ईडी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2020 मध्ये संपणार होता. मात्र केंद्राने त्यांना तीन वेळा सेवेत मुदतवाढ दिली. या निर्णयावर विरोधकांनी टीका केली होती आणि या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. (हेही वाचा: INDIA Boycotts 14 TV Anchors: इंडिया आघाडीने देशातील 14 टीव्ही अँकरवर टाकला बहिष्कार; त्यांच्या शोमध्ये पाठवणार नाही प्रतिनिधी)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)