राजस्थानमधील Nafisa Attari या महिला शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. उदयपूर येथील डीएसपी महेंद्र पारिक यांच्या हवाल्याने एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार आयपीसीच्या कलम १५३ बी (अभियोग, राष्ट्रीय एकात्मतेसाठी पूर्वग्रहदूषित विधान) नफिसा अत्तारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्तारी यांनी टि ट्वेंटी सामन्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देतानाचा एक व्हाट्सअॅप स्टेटस ठेवला होता. त्यावरुन त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. त्या नंतर त्यांच्या शाळा व्यवस्थापनाने त्यांना सेवेतून कमी केले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)