मुंबई मध्ये आज च्या दिवशी बाप्पांची दहा दिवस सेवा केल्यानंतर विसर्जनाची धामधूम सुरू आहे. बाप्पाला निरोप देण्याचा क्षण भावूक करणारा असला तरीही गणेशभक्त मोठ्या उत्साहात भव्य मिरवणूकांनंतर गणेशमूर्तींचं विसर्जन करतात. अनेक लहान मोठे गणपती विसर्जनाला समुद्रावर येतात पण आज रात्री रात्री ११:२४ वाजता भरती आहे. या भरती मध्ये ४.३९मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा गणेश विसर्जन लवकर आटपण्याची शक्यता आहे. तसेच रात्री उशिरा गणेश विसर्जन करणार्‍यांनी देखील विशेष काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रात्री 11 पूर्वीच मोठ्या गणेशमूर्तींचं विसर्जन आटोपण्याचा अंदाज आहे. Ganesh Visarjan 2024 Muhurat: आज गणेश विसर्जनासाठी 4 शुभ मुहूर्त.

मुंबई मध्ये आज भरती कधी?

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)