मध्य प्रदेशातील नरसिंगपूरमध्ये पोलिसांचा अमानवी चेहरा पाहायला मिळाला आहे. येथे पोलिसांनी एका महिलेला गाडीच्या बोनेटवर अर्धा किमी फरपटत नेले आहे. यासाठी कारण फक्त इतकेच होते की, महिलेने आपल्या मुलाची सुटका करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली होती. घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. आता एसपी नरसिंगपूर यांनी आरोपी पोलिसांवर कारवाई केली आहे. व्हिडिओमध्ये एक महिला पोलिसांच्या गाडीच्या बोनेटवर लटकलेली दिसत आहे. या गाडीतून पोलीस संशयित ड्रग्ज तस्कर घेऊन जात होते. ड्रग्जची तस्करी केल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आलेल्या आपल्या मुलाला सोडवण्याचा या महिलेचा प्रयत्न होता.

या प्रकरणाबाबत गृहमंत्री मिश्रा म्हणाले की, आम्ही व्हायरल व्हिडिओची दखल घेतली असून तीन पोलिसांना निलंबित केले आहे. यासोबतच विभागीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. नरसिंगपूरच्या एसडीओपी भावना मारवी यांनी सांगितले की चौकशीदरम्यान आरोप सिद्ध झाल्यास नियमांनुसार आरोपी अधिकार्‍यांवर योग्य कारवाई केली जाईल. (हेही वाचा: भाजप नेता Pravesh Shukla याने आदिवासी व्यक्तीवर केली लघवी? लज्जास्पद व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आदेश)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)