मध्य प्रदेशातील एका आदिवासी व्यक्तीवर मद्यधुंद व्यक्ती कथितपणे लघवी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साधारण 11 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेला एक माणूस रस्त्यावर बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीवर लघवी करताना दिसत आहे. मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. विविध बातम्यांनुसार, व्हिडिओमध्ये जो माणूस दुसऱ्या पुरुषावर लघवी करताना दिसत आहे, तो भाजप नेता प्रवेश शुक्ला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अशाप्रकारे भाजपच्या राजवटीत हे लज्जास्पद कृत्य भाजपच्या नेत्यानेच केले असल्याचे सांगितले जात आहे. प्रवेश हा भाजप आमदार केदार शुक्ला यांचा आमदार प्रतिनिधी आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ट्विटरवर अनेकांनी हा व्हिडिओ ट्विट करत आरोपी प्रवेश शुक्लाला अटक करण्याची मागणी केली आहे.

शिवराज सिंह चौहान यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि भाजप नेत्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सीएम शिवराज यांनी ट्विट करून लिहिले आहे, ‘सीधी जिल्ह्याचा एक व्हायरल व्हिडिओ माझ्या निदर्शनास आला आहे. मी प्रशासनाला दोषीला अटक करून कठोर कारवाई करून एनएसए लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.’ अहवालानुसार, पोलिसांनी प्रवेश शुक्ला याच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 294, 504 आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. (हेही वाचा: Agra Shocker: धक्कादायक! हरियाणातील पर्यटक ताजमहाल टूरचा आनंद घेत असताना बंद कारमध्ये पाळीव कुत्र्याचा मृत्यू; Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)