एका वाहतूक पोलिसाला (Traffic Police) कार चालकाने कारच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याची घटना नवी मुंबईत (Navi Mumbai) घडली आहे. कार चालकांने सिग्नल तोडल्यावर त्याला थांबवायला गेलेल्या वाहतुक पोलिसाला न जुमानता कार पुढे सुरु ठेवली. यानंतर कार थांबवण्यासाठी कारच्या बोनेटवर बसले. असे होऊन देखील कार चालकाने कार थांबवली नाही आणि तो ती पळवत राहिला. पाल्म बिच रोडपासून ते वाशी गव्हान फाट्यापर्यंत कारचालकाने वाहतुक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेले. या कार चालकाला अटके केली असून त्याने गांज्याची नशा केल्याची माहिती मिळाली आहे.
पहा व्हिडिओ -
Watch | A traffic constable in Navi Mumbai was dragged on top of a car's bonnet for about 20km along the Palm Beach Road from Vashi till Gavhan Phata near Uran after he tried to stop a motorist for jumping traffic signal. pic.twitter.com/U4vdinnC5g
— TOI Navi Mumbai (@TOINaviMumbai) April 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)