हरियाणाच्या हिंसाचारग्रस्त नूह जिल्ह्यात 11 ऑगस्टपर्यंत मोबाईल इंटरनेटवर बंदी असेल. हरियाणा सरकारने हा आदेश जारी केला आहे. हरियाणा सरकारने नूहमधील मोबाइल इंटरनेट आणि एसएमएस सेवांचे निलंबन 8 ऑगस्टवरून 11 ऑगस्टपर्यंत वाढवले ​​आहे. 31 जुलै रोजी विश्व हिंदू परिषदेची मिरवणूक रोखण्याच्या प्रयत्नावरून नूहमध्ये हिंसक चकमक झाली होती. यानंतर मोबाईल इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्यात आली. नंतर हा संघर्ष गुरुग्राम आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पसरला. या संघर्षात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा: Kanwar Yatra News: दगडफेकीच्या अफवेने कंवर यात्रेत चेंगराचेंगरी,आरोपींवर कडक कारवाईची निर्देश)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)