विश्व हिंदू परिषदेच्या रॅलींवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. हरियाणातील नूह येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आज दिल्लीत विविध ठिकाणी निदर्शने आणि रॅली काढत आहे. या रॅलींवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी दिल्ली आणि हरियाणा सरकारला नोटीस पाठवल्या असून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या रॅलीत हेट स्पीच दिल्या जाणार नाही याची दक्षता घेण्याचे याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पाहा पोस्ट -
#BREAKING Ensure that there are no hate speeches or violence in VHP-Bajrang Dal rallies in Delhi-NCR : Supreme Court directs authorities.#NuhViolence https://t.co/coaL6rMxnB
— Live Law (@LiveLawIndia) August 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)