दिल्ली महापालिका निवडणुकीत हाती आलेल्या प्राथमिक अंदाजानुसार आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. आम आदमी पक्ष 20, भाजप 9 तर काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे. पाठिमागील 15 वर्षांपासून दिल्ली महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या सत्तेला या वेळी सुरुंग लागतो की काय अशी चर्चा आहे. प्राथमिक अंदाज जर मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिले तर दिल्ली महापालिकेतून भाजपला घाशा गुंडाळावा लागू शकतो. क्षणाक्षणाला उत्सुकता वाढते आहे. त्यामुळे अवघ्या देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)