अभिनेते मनोज कुमार यांचे आज (4 एप्रिल) वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनावर रसिकांसोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे. 'मनोज जी यांच्या कलाकृतींनी राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत केली आणि पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. या दुःखाच्या वेळी माझे विचार त्यांच्या कुटुंबासोबत आणि चाहत्यांसोबत आहेत. ओम शांती.'अशी पोस्ट पीएम मोदी यांनी केली आहे. दरम्यान मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटल मध्ये मनोज कुमार यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले आहे. उद्या त्यांच्यावर अंंत्यसंस्कार केले जातील. Manoj Kumar Passes Away: ‘भारत कुमार’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन.

पीएम नरेंद्र मोदी

राजनाथ सिंह

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू

सुप्रिया सुळे

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)