Man Dies Of Heart Attack During Cricket Match: मध्य प्रदेशमधील गुना येथे क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी एका 28 तरुणाचे निधन झाले. नुकतेच महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या पीडितेचे नाव दीपक खांडेकर असे असून तो भामोरी परिसरात राहणारा आहे. दीपक हा त्याच्या मित्रांसह गावाशेजारील एका मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. त्याचा संघ फलंदाजी करत होता, आणि तो आतुरतेने त्याच्या फलंदाची वाट पाहत होता. यावेळी अचानक त्याच्या छातीत दुखू लागले आणि तो कोसळला. त्याच्या साथीदारांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले, पण ते पोहोचले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (हेही वाचा: Telangana Accident Video: तेलंगणाच्या सिद्धीपेट जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात; दुभाजक तोडून दुसऱ्या कारवर आदळली गाडी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)