मानवतेला काळिमा फासणारी एक घटना नोएडातून समोर आली होती. या ठिकाणी एका माणसाने आपल्या दुचाकीने उंदराला चिरडून मारले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण नोएडाच्या ममुरा सेक्टर 66 शी संबंधित आहे. हा व्यक्ती या भागात बिर्याणीचे दुकान चालवतो असे सांगितले जात आहे. आता माहिती मिळत आहे की, या दुचाकीने उंदराला चिरडणाऱ्या आरोपीला फेज 3 पोलीस स्टेशनने अटक केली आहे. या व्यक्तीवर 151 CrPC अंतर्गत शांतता भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस उंदराला बाईकच्या चाकाखाली चिरडताना दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. (हेही वाचा: Delhi Viral Video: पार्किंगच्या वादावरुन वृद्धाकडून शेजारच्या तरुणावर रॉडने हल्ला, महिलेसोबतही केले गैरवर्तन)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)