Flight Loses Tyre: विमानाने उड्डाण घेताच अवघ्या काही सेकंदात विमानाचं टायर निखळल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युनायटेड एअरलाइन्सचे बोईंग 777-200 विमान सॅन फ्रान्सिस्कोहून उड्डाण घेऊन जपानला जात होते. त्यावेळी विमानात 235 प्रवासी आणि 14 क्रू मेंबर होते. अचानक विमानाच्या डाव्या बाजूच्या मुख्य लँडिंग गियर असेंब्लीवरील सहा टायरपैकी एक टायर निखळला आणि तो खाली पडला. विशेष म्हणजे हा टायर खाली एका पार्क असलेल्या कारवर पडला. ज्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले. टायर खूप उंतावरून खाली पडल्यामुळे कारची मागची बाजू चक्काचूर झाली. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)