Maharashtra Rain Update:  मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वरूण राजाचं आगमन झालं आहे. मुंबईतील शनिवारच्या मुसळधार पावसाने अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील काही तासांसाठी महाराष्ट्रातील काही भागात अलर्ट जाहीर केला आहे. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर पालघर, मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग ह्या ठिकाणी यलो अलर्ट जाहिर केला आहे.

पावसाचा जोर काल पासून वाढल्याने भारतीय हवामान खात्याने काही भागात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. ह्याचा आढावा घेत भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर ह्या ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील पाच दिवस हे मुसळधार पावसाचे असल्याचे दिसून येत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)