Amritpal Singh To Contest Lok Sabha Elections: खलिस्तान समर्थक आणि 'वारीस पंजाब दे' प्रमुख अमृतपाल सिंग पंजाबच्या खादूर साहिब लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्याच्या उमेदवारीला  मंजुरी देण्यात आली आहे. या जागेवरून तो अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. अमृतपाल सिंग याने त्याच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात केवळ 1000 रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. याशिवाय त्याच्याकडे कोणतीही जंगम किंवा स्थावर मालमत्ता नाही. तो 10वी पास असून त्याच्यावर 12 गुन्हे दाखल आहेत. मात्र, आजपर्यंत त्याला कोणत्याही प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले नाही. सध्या अमृतपाल सिंग राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) आसामच्या दिब्रुगड तुरुंगात बंद आहे. पंजाबमध्ये 1 जूनला मतदान होणार आहे. गेल्या वर्षी 23 एप्रिल रोजी अमृतपालला अटक करून ताब्यात घेण्यात आले होते. उमेदवार तुरुंगातूनच आपला उमेदवारी अर्ज भरू शकतो आणि त्याच्या प्रतिनिधीमार्फत पाठवू शकतो. तशी तरतूद आहे. (हेही वाचा: Rahul Gandhi and Sonia Gandhi: 'अमेठी, रायबरेलीतून साद आल्यास आम्ही तिथे हजर राहू'; राहुल गांधीकडून सोनिया गांधींसोबत भावनिक व्हिडीओ शेअर)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)