Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धर्म आणि धार्मिक स्थळांच्या नावावर मते मागितल्याचा ठपका ठेवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निवडणूक लढवण्यास 6 वर्षांची बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकाकर्ते वकील आनंद एस जोंधळे यांनी त्यांच्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. याचिकाकर्त्याने पीएम मोदींनी 9 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे दिलेल्या भाषणाचा हवाला दिला होता. याचिकेत म्हटले आहे की, भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी मतदारांना हिंदू देवता आणि हिंदू पूजास्थळे तसेच शीख देवता आणि शीख प्रार्थनास्थळांच्या नावाने भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले होते.

आता ही याचिका फेटाळत न्यायमूर्ती सचिन दत्ता म्हणाले की, याचिका पूर्णपणे चुकीची आहे कारण ती भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) विशिष्ट पद्धतीने कार्य करण्याचे निर्देश देऊ शकत नाही. यावेळी भारतीय निवडणूक आयोगातर्फे उपस्थित असलेले वकील सिद्धांत कुमार म्हणाले की, निवडणूक आयोगाला दररोज असे अर्ज येत आहेत आणि ते कायद्यानुसार कारवाई करतील. (हेही वाचा: Lok Sabha Election 2024: 'भेटवस्तूंऐवजी मोदींना मत द्या'! लग्नपत्रिकेवर PM Modi यांचा प्रचार करणे पडले महागात, वधू-वरांवर गुन्हा दाखल)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)