भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) डिसेंबर तिमाहीची आकडेवारी जाहीर केली आहे. आयुर्विमा महामंडळाच्या म्हणण्यानुसार, या कालावधीत त्यांचा निव्वळ नफा 8334 कोटी इतका वाढला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 235 कोटी रुपये होता. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत, विमा कंपनीचा निव्वळ नफा 15952 कोटी रुपये होता. त्याच वेळी, एप्रिल ते जून या तिमाहीत विमा कंपनीचा निव्वळ नफा 682.9 कोटी रुपये होता. डिसेंबर तिमाहीत कंपनीचे निव्वळ प्रीमियम उत्पन्न वाढून 1.11 लाख कोटी झाले आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत ते 97,620 कोटी रुपये होते. गुंतवणुकीतून एलआयसीचे निव्वळ उत्पन्न वार्षिक 11 टक्क्यांनी वाढून 84,889 कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत 76,574 कोटी रुपये होते. निकाल जाहीर होण्यापूर्वी बीएसईवर एलआयसीचे शेअर्स 0.53% वाढून 613.35 रुपयांवर बंद झाले. गेल्या चार दिवसांपासून एलआयसीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.
LIC's net income jumps to Rs 8,334.2 crore in Q3 against Rs 235 crore a year ago: Filing
— Press Trust of India (@PTI_News) February 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)