तुमची एलआयसी पॉलिसी लॅप्स झाली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकेल. एलआयसीने आपल्या ग्राहकांसाठी वैयक्तिक विम्यासह पॉलिसी पुनरुज्जीवित करण्याची संधी देणारी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. एलआयसीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ULIPs वगळता, सर्व पॉलिसी विलंब शुल्क माफीसह विशेष मोहिमेअंतर्गत पुनरुज्जीवित केल्या जाऊ शकतात. ही मोहीम 17 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत चालेल.

निवेदनानुसार, ULIPs व्यतिरिक्त इतर सर्व पॉलिसी काही अटींच्या अधीन राहून ही विशेष मोहीम अशा पॉलिसीधारकांसाठी सुरू करण्यात आली आहे, जे कोणत्याही कारणामुळे प्रीमियम भरू शकले नाहीत आणि त्यांची पॉलिसी बंद करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)