केरळच्या गर्व्हनर ला Z+ दर्जाची सुरक्षा  देण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. सीआरपीएफचे Z+ सुरक्षा कवच राज्यपाल आणि केरळ राजभवनाला देण्यात आलं आहे. त्यांना कोल्लम मध्ये काळे झेंडे दाखवल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. सीपीआयएमची विद्यार्थी संघटना एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. त्यामुळे राज्यपाल इतके संतप्त झाले की, ते तात्काळ गाडीतून उतरले आणि रस्त्याच्या कडेला संपावर बसले. राज्यपालांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदाराकडून खुर्ची मागितली आणि ते तिथेच  बसले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)