Woman Beats Elderly Father-in-Law: कर्नाटकातील मंगळुरू येथून एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. येथे एका महिलेने आपल्या वृद्ध सासऱ्याचा शारीरिक छळ केला आहे. घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अत्याचाराची ही घटना कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ही महिला आपल्या सासऱ्याला काठीने मारत आहे आणि नंतर त्याला धक्का देत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंगळुरू पोलिसांनी कर्नाटक वीज मंडळात काम करणाऱ्या उमाशंकरी नावाच्या महिलेला अटक केली आहे. या घटनेची माहिती देताना मंगळुरूचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त दिनेश यांनी सांगितले की, सोमवारी कनकनडी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की, उमाशंकरी नावाच्या महिलेने तिचे सासरे पद्मनाभ सुवर्णा (87) यांना कुलशेखर परिसरात काठीने मारहाण केली आहे. त्यानंतर घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी महिलेला अटक केली. सुवर्णा यांची मुलगी प्रियाच्या तक्रारीवरून पोलिसांनी उमाशंकरीविरुद्ध गुन्हा नोंदवला. महिलेला न्यायालयात हजर करण्यात आले तेथून तिला कारागृहात पाठवण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. (हेही वाचा: Ghazipur Accident:11 हजार वोल्ट विद्युत प्रवाशी प्रवासी बसचा संपर्क, सहा जणांचा आगीत भाजून मृत्यू)
Karnataka: Woman Thrashes Elderly Father-in-Law With His Walking Stick in Mangaluru, Arrested After Video Surfaces #Mangaluru #Karnataka #ViralVideo https://t.co/mRd986UwIu
— LatestLY (@latestly) March 11, 2024
#Mangalore daughter-in-law #assaults father-in-law with a walking stick; video goes viral; KEB officer #Umashankari has been arrested by Mangalore #Police after the video went viral on social media. #BreakingNews #daughter pic.twitter.com/T82lhr7m0V
— Headline Karnataka (@hknewsonline) March 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)