कर्नाटकातील बल्लारी येथे बुधवारी एका 23 वर्षीय महिलेने एका मतदान केंद्रावर मुलाला जन्म दिला. ही माहिती देताना निवडणूक आयोगाने सांगितले की, विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी ही महिला बल्लारीच्या कुर्लागिंडी गावातील मतदान केंद्रावर पोहोचली होती, त्यावेळी तिची प्रसूती झाली. प्रसूतीमध्ये महिला अधिकारी आणि महिला मतदारांनी सहकार्य केल्याचे आयोगाने सांगितले. कर्नाटकमध्ये बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 65.69 टक्के मतदान झाले आहे. बुधवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान मोठ्या प्रमाणात शांततेत पार पडले आणि कोणत्याही मतदान केंद्रावर पुन्हा मतदानाची गरज भासणार नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. (हेही वाचा: Karnataka All Exit Poll Results 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी AajTak-India Today, ABP-CVoter, Axis My India यांच्यासह सर्व एक्झिट पोल्सचे निकाल पाहा एका क्लिकवर)
Karnataka polls: 23-year-old woman delivers baby at polling station in Ballari, says EC
— Press Trust of India (@PTI_News) May 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)