Karnataka- Congress Govt Ends Hijab Ban: कर्नाटकामध्ये मागील भाजप सरकारने घातलेली हिजाब बंदी आता उठवण्यात आली आहे. राज्यातील काँग्रेस सरकारने हिजाब बंदी हटवण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकार हिजाब बंदी मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोशल मीडियावर केली. याआधी 2022 मध्ये मागील भाजप सरकारने हिजाबवर बंदी घातली होती. X वरील एका पोस्टमध्ये सिद्धरामय्या यांनी भाजपवर कपडे, पोशाख, जात यांच्या आधारावर लोकांमध्ये आणि समाजामध्ये फूट पाडल्याचा आरोप केला. त्यांनी कन्नडमध्ये ट्विट केले, ;मी हिजाब बंदी मागे घेण्यास सांगितले आहे.’ याआधी म्हैसूर येथे एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले होते की, ‘तुम्ही कसे कपडे घालता आणि काय खावे ही तुमची निवड आहे. राज्यातील लोक जे आवडतील ते घालण्यास आणि खाण्यास स्वतंत्र आहेत.’ (हेही वाचा: Wine and Dine In Gujarat's GIFT City: गुजरातच्या 'गिफ्ट' सिटीमधील हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबमध्ये करू शकाल मद्यपान; सरकार देणार परमिट)
#Hijab #Karnataka pic.twitter.com/C3bb7xGZ6w
— NDTV (@ndtv) December 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)