Jashodaben Agra Temple Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदा बेन मोदी यांनी गुरुवारी आग्रा येथे बालाजी महाराजांचे दर्शन घेतले. यानंतर त्या शहरातील दयालबाग टागोर नगरमध्ये राहणारे भाजप नेते मंजू सिंह राठोड यांच्या घरीही गेल्या. सुमारे तासभर त्या आग्रामध्ये होत्या. जशोदा बेन मंदिरातील दर्शनाव्यतिरिक्त कोणत्याही कार्यक्रमात सहभागी झाल्या नाहीत. यावेळी त्यांनी मीडियापासून अंतर राखले. मात्र पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदा बेन या भाजप नेत्याच्या घरी आल्याची बातमी पसरताच स्थानिक लोक तेथे जमा झाले. काही मिडियावालेही आले होते. प्रसारमाध्यमांनी त्यांना नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याबाबत अनेक प्रश्न विचारले, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, जशोदाबेन यांनी सर्व प्रश्न हसतमुखाने टाळले आणि कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. (हेही वाचा: MPs With Criminal Charges: यंदाच्या 18 व्या लोकसभेत 543 पैकी 251 नवनिर्वाचित खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल; कनिष्ठ सभागृहाच्या इतिहासात सर्वोच्च)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)