विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट प्रदर्शित होताच धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाला खूप चांगले रिव्ह्यूज मिळत आहेत. यासोबतच चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनही उत्तम चालले आहे. सोशल मिडियावर सध्या याच चित्रपटाची चर्चा सुरू आहे. अशात मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर 'छावा' सिनेमाबद्दल प्रतिक्रिया देत या सिनेमाचे आणि सर्व कलाकारांचे कौतुक केले आहे. शरद पोंक्षे यांनी याबाबत एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये ते म्हणतात- ‘नमस्कार! मी आताच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत, लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘छावा’ सिनेमा पाहिला. खूपच उत्तम चित्रपट बनवला आहे. प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक हिंदूने हा चित्रपट पाहायला हवा. रक्त सळसळते, डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी, आपल्या शंभूराजांनी एवढे कष्ट घेतले, त्या नालायक औरंगजेबाने क्रुरतेच्या सर्व सीमा पार केल्या. आता लक्ष्मण उतेकर यांनी अतिशय उत्तमरीत्या हा चित्रपट बनवला आहे.’
ते पुढे म्हणतात, ‘विकी कौशलसह सर्व कलाकारांनी उत्तम भूमिका साकारली आहे. औरंगजेब शेवटी आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची इतक्या क्रुरपणे हत्या करतो ते पाहवत नाही. जिथे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशव्यांसारखे महानायक या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मले, तिथे दुसरीकडे आहे ही सध्याची पिढी. त्यांनी शिकायला पाहिजे. मी हात जोडून विनंती करतो की, आताच तिकीट काढा आणि छावा बघा.' (हेही वाचा; Chhaava Box Office Collection Day 2: 'छावा' ने 24 तासांत 5 मोठ्या चित्रपटांच्या लाईफटाईनच्या कमाईचा टप्पा ओलांडला, बॉक्स ऑफिसवर केला मोठा चमत्कार)
Sharad Ponkshe on Chhaava Film:
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)